IAAA Learning Center
विविध जागतिक (IAAA) सर्टिफिकेशन आणि करिअर कार्यशाळा

जवाहर इंस्टीटयूट ऑफ टेक्नोलोजी, नाशिक येथील संगणक विभागाने IAAA Learning center चे शनिवार ०१ सप्टेंबर २०१८ रोजी मा.डॉ. एम. व्ही. भटकर यांच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात आले. IAAA ही एक USA | India | Australia | New Zealand यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पातळीवरील संस्था आहे .IAAA Learning center च्या माध्यमातून विद्यार्थांना नवनवीन तंत्रज्ञानाविषयीचे अभ्यासक्रम आत्मसात करता येतात. त्याचप्रसंगी सदर Learning center च्या अंतर्गत संगणक विभाग तर्फे Sequential Development Platform (SDP) या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली . Sequential Development Platform monthly development program for candidates in third/final year of Engineering graduate students.

तुम्हाला जागतिक पातळीवर या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे असे आव्हान श्री महेश शिरोडे President IAAA National Chapter –India यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थांना आव्हान केले . तसेच त्यांनी ‘‘जागतिक सर्टिफिकेशन” किती महत्वाचे आहे या विषयी माहिती दिली . या कार्यशाळेत श्री. प्रसाद महामुनी (IAAA) Sequential Development Platform(SDP) यांनी त्यामागील इत्यंभूत माहिती देण्यात आली.

संगणक शाखेच्या विभागप्रमुख प्रा. गीतांजली मोहोळे, या कार्यशाळेचे समन्वयक प्रा.शरद पाटील. यांनी या कार्यशाळेची माहिती देतांना सांगितले कि विद्यार्थ्यांसाठी आयोजीत केलेल्या या कार्यशाळेमुळे विद्यार्थी स्वता: वर्षभरात SDP प्रकारच्या सर्टिफिकेशन ट्रेनिंगमुळे विविध जागतिक सर्टिफिकेशन प्राप्त करून सॉफटवेयर कंपनीच्या गरजांची पूर्तता करू शकतील. आणि आपल्या करिअरला घडवू शकतील. तसेच इतर इंजिनीरिंग कॉलेज मधील उत्सुक विद्यार्थी सुद्धा सदरहू SDP प्रकारच्या सर्टिफिकेशन ट्रेनिंग कार्यशाळेला प्रवेश घ्यावा असे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम. व्ही. भटकर यांनी केले आहे .. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी संगणक शाखेच्या सर्व प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन हर्षदा दास तर आभार प्रदर्शन साक्षी शेळके या विद्यार्थीनिनी केले.Certifications under IAAA

 • Agile Scrum
 • APPIUM, SELENIUM, JMETER, MOBILE TESTING
 • DEVOPS, Business Analyst, System Analyst
 • Project Management
 • Software Development
 • Software Testing
 • Human Resource, Learning and Development
 • Domain Professional
 • Digital Marketing, SEO, Brand Manager, Startup
 • Language- Certified Business English Proficient
 • Business Operations, Marketing, Accredited Assessor
 • Blockchain Cryptocurrency Certification


Admission Open for 2022-23
Mechanical, Electrical, Civil Computer, IT, AIDS